यावल ते चोपडा मार्गाची अत्यंत दयानिय अवस्था

यावल (प्रतिनिधी) यावल ते चोपडा या मार्गाची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन यावल सार्वजानिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभारामुळे या रस्त्यावर अपघात होवुन निरपराध नागरीकांचे बळी जात आहे. 

यावल ते चोपडा या मार्गावर यावल ते किनगाव पर्यंतच्या सुमारे १५ किलो मिटरच्या मार्गावरील रस्त्याची मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता हे बोलणे अवघड झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे वारंवार अपघात होवुन अनेक नागरीकांना आपला जिव गमवावे लागले आहे . दरम्यान माध्यमातुन वृत्त प्रसिद्ध झाले की यावलचे सार्वजनिक बांधकाम थातुरमातुर दुरूस्ती करून वेळ काढुन घेत असते मात्र या मार्गाची झालेली ही खड्डेमय अवस्था कायमची कधी व कशी संपेल आणी अजुन किती नगरीकांचा बळी जाणार याकरीता मात्र लोकप्रतिनिधी आणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे भोंगळ प्रशासन कधी लक्ष देणार या प्रश्नाचे उत्तर नागरीकांना कधी मिळेल हे अद्याप तरी कळालेले नाही .

 

Protected Content