१३ राज्यातील ४८ विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी १३ राज्यांमधील ४८ विधानसभेच्या जागांसाठी दोन टप्प्यात पोटनिवडणूक जाहीर केली. विधानसभेच्या ४८ जागांपैकी ४२ आमदार हे खासदार झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ११ आमदार काँग्रेसचे, ९ भाजपचे, समाजवादी-तृणमूलचे प्रत्येकी ५ आणि इतर पक्षांचे १२ आमदार आहेत.

उर्वरित सहा जागांपैकी तीन जागा मृत्यूमुळे रिक्त झाल्या आहेत. सपा आमदार तुरुंगात गेल्याने, सिक्कीममधील दोन आमदारांचे राजीनामे आणि मध्य प्रदेशात एका आमदाराने पक्ष बदलल्यामुळे ही जागा रिक्त झाली

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४८ जागांपैकी सर्वाधिक ९ जागा आहेत. राजस्थानमधून ७, पश्चिम बंगालमधून ६, आसाममधून ५, बिहारमधून ४, पंजाबमधून ४, कर्नाटकमधून ३, केरळमधून २, मध्य प्रदेशातून २, सिक्कीममधून २, गुजरातमधून १, उत्तराखंडमधून १, मेघालयातून १ आणि छत्तीसगड विधानसभेची १ जागा आहे.

Protected Content