चाळीसगावात गुटखा व तंबाखूचा साठा जप्त; मुद्देमालासह दोघांना अटक

चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील विविध भागात पोलीस कर्मचारी हे पेट्रोलींग करत असतांना हनुमान वाडी परिसरात एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असतान त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा व तंबाखूची वाहतूक होत असल्यासचे दिसून आले. पोलीसांनी वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याप्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी पोलीसांनी पेट्रोलींग करत असतांना सउद अहमद गुलाब दस्तगीर अंसारी रा. नागर दरवाजा रोड येवला जिल्हा नाशिक आणि सईद ताहीरअन्सारी रा. मोमीनपुरा येवला या दोघांचे वाहन आडविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळून आला. पोलीसांनी हा साठा जप्त करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलिसांनी अनधिकृत गुटखा आणि तंबाखू जप्त करून कारवाई केली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सउद अहमद गुलाब दस्तगीर अंसारी रा. नागर दरवाजा रोड येवला जिल्हा नाशिक, सईद ताहीरअन्सारी रा. मोमीनपुरा येवला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमसार कबाडी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप घुले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील, पोलीस हवालदार योगेश बेलदार, पोलीस हवालदार नितीन वाल्हे, पोलीस हवालदार रमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक चौधरी केली आहे.

Protected Content