तरूणाच्या घरातून महागडे दोन मोबाईल लांबविले

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, शुभम वासुदेव मोरे वय 26 रा. भोकर ता. जळगाव ह.मु. बांभोरी ता. धरणगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांभोरी गावातील हिताची कंपनी तो नोकरीला आहे. शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता तो कामावर निघून गेला. त्यावेळी त्याचे घर बंद होते, दरम्यान अज्ञात चोरट्याने त्याच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना दुपारी ४ वाजता उघडकीला आले. त्यानंतर शुभमने त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु मोबाईल संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील लोहार करीत आहे.

Protected Content