वनोली श्री साईबाबा मंदिरात महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील श्री क्षेत्र साईबाबा मंदिरात १० ऑक्टोबर गुरुवार रोजी म्हणजेच अश्विन शुद्ध सप्तमी या दिवशी श्री साईबाबा मंदिराचा महाप्रसाद संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला आहे. समस्त भाविक भक्तांनी महाप्रसादासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन साईबाबा संस्थान अध्यक्ष हिरालाल चौधरी उपाध्यक्ष व विश्वस्तांसह गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व संचालक मंडळ तसेच विकास सोसायटी चेअरमन व संचालक मंडळ व ग्रामस्थ वनोली यांनी आवाहन केले आहे.

आश्विन शुद्ध सप्तमी ही गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर या दिवशी येते घटस्थापनेनुसार आठव्या दिवशी साईबाबा मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्यानुसार यावर्षी १०ऑक्टोबर गुरुवार रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे भाविक भक्तांनी येथे महाप्रसादासाठी यावे व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ११ ऑक्टोबर शुक्रवार रोजी साईबाबा देवस्थानची यात्रा संपन्न होणार आहे सव्वाशे फूट उंच देवकाठीची सवाद्य मिरवणुक गावामध्ये काढण्यात येते व याच दिवशी संध्याकाळी बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .

श्री साईबाबा महाराज शिर्डी येथे जात असताना वनोली गावी या मंदिराच्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना केली होती म्हणूनच या मंदिराला साईबाबा महाराजांचे नाव देण्यात आले आहे या ठिकाणी भक्तगण मानता मानतात गोडेतेल नारळ या ठिकाणी मंदिरात अर्पण करीत असतात शेकडो वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता त्याकाळापासुन या ठिकाणी साईबाबा महाराजांनी अखंड ज्योत या दिव्यांची सुरू असून, शेकडो भाविक दरवर्षी या ठीकाणी दर्शनासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपली हजेरी लावतात.

Protected Content