Home क्राईम धक्कादायक : अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; अत्याचारातून दिला मुलाला जन्म

धक्कादायक : अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; अत्याचारातून दिला मुलाला जन्म


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्यावर अत्याचार करत गर्भवती केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासरे, आई-वडील यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील गणेशवाडी भागामध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न जानेवारी २०२२ मध्ये लावून दिले. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यावर तिच्या पतीने अत्याचार करत तिला गर्भवती केले. त्यानंतर तिने एका रुग्णालयात मुलाला जन्म दिला, हा प्रकार आरोग्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना माहिती देण्यात आली. दरम्यान पीडित मुलींनी दिलेली दिलेल्या फिर्यादीवरून तिचे पती आई-वडील सासू-सासरे यांच्या विरोधात ऑनलाईन पद्धतीने तक्रार करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहे


Protected Content

Play sound