डांभुर्णी येथे बिबटयाच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गावठाण भागात बिबटयाच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील डांभुर्णी येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गावठाण भागात मोरेश्वर रमेश कोळी यांचे खळे असून या खळ्यात त्यांची बैलजोडी सह गाय व वासरे आहेत. काल रात्री खळ्यात गुरांना चारा टाकून घरी आल्यानंतर सकाळी सात वाजता मोरेश्वर कोळी खळ्यात गेले असता त्यांना तीन वषय गोऱ्याचा फडशा पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गावात येऊन लोकांना माहिती दिली असता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेंच या घटनेची माहिती यावल येथील वन अधिकारी यांना कळवली असता वन क्षेत्रपाल विपुल पाटील व सहकारी दिपक चव्हाण,चेतन शेलार,योगेश मुंडे, अजिंक्य बाभुळकर नागपूर,किरण पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

( प्रतिकात्मक संग्रहीत छायाचित्र )

घटनेची माहिती मिळताच पशुवैद्य अधिकारी डॉ. आर सी भगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव येथील सहकारी प्रशांत दुसाने यांनी घटनास्थळी आपली उपस्थिती नोंदवली घटनेची माहिती व स्थानिक पाहणी करून पंचनामा करण्यात आला व पुढील अहवाल वरिष्ठकडे पाठवण्यात आला या प्रसंगी शिकार करणारा प्राणी हा बिबट्या असून तो नर असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे .
या परिसरात लोकांनी एकटे फिरणे, आपली गुरे खळ्यात ठेवणे घातक असल्याचे व पुंन्हा हा बिबट्या या भागात शिकारी साठी येऊ शकतो त्यासाठी गावकऱ्यांनी आपल्या खळ्यात गोणपाटची मशाल बनवून त्यावर ऑइल व लाल मिरची पावडर टाकून धुर निर्माण केल्यास बिबट्या येणार नसल्याची सूचना वनपाल विपुल पाटील यांनी दिली.
दरम्यान, गावात बिबट्याने गोऱ्ह्याचा फशा पडला असल्याच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकर्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान आदर्श ग्रामसेवक संजय चव्हाण यांनी केले आहे. गावात दवंडी फिरू नये गावाकऱ्यांना जंगलात व वाटेने एकटे न जाता समूहाने वावरणे,उघड्यावर शौचाल्यास न जाने,मूल घराबाहेर निगणार नाही याची काळजी घेणे, बिबट्या व वन्य हिंश्र प्राणी कुणाच्या निदर्शनास पडताच यावल वन विभागाला सूचीत करावे आशा प्रकारे दावंडीतून नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पाहणी दरम्यान तीन वर्षाचा गोऱ्हा असून अंदाजित दहा ते पंधरा हजारापर्यंत पशुधन मालकाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी ग्रामस्थ व पशुपालक मोरेश्वर कोळी यांनी केली आहे.

Protected Content