यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उपवनसंरक्षक यावल जमीर शेख यांचे कार्यालयात कल्पतरु सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष- मयुर अरुण पाटील यांच्या वतीने यावल वन विभागात सातपुडा पर्वतरांगांत जल पुनरुज्जीवन, शेतीसाठी जलस्त्रोतांची निर्मिती वनसंवर्धन आणि स्थानिक समुदायां च्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने उपक्रम अंमलबजावणी करण्यासाठी करार करण्यात आला.
या उपक्रमात जल पुनरुज्जीवन उपक्रम, शेतीसाठी व दैनंदिन वापरा साठी जलस्त्रोतांची निर्मिती,जंगल तोड थांबवण्यासाठी पुढाकार, वनजमीन संवर्धन,स्थानिक समाजा साठी सर्वांगीण विकास प्रकल्प, जैवविविधता संवर्धन, समुदायाचा सहभाग,पाणलोट व्यवस्थापन, जलसंधारण जागरुकता,उपजीविका सुधारणा,सामुदायिक सहभाग या उद्दीष्टानुसार कल्पतरु सेवाफाऊंडेशन देखरेख आणि मुल्यमापन अहवाल देणे,निधी आणि संसाधने बाबत संयुक्तिक जबाबदाऱ्याद्वारे करार करण्यात आला. याप्रसंगी जमीर एम.शेख (उपवनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगांव )व कल्पतरु सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष मयुर अरुण पाटील उपस्थित होते.