जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील एका भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. तिच्या नातेवाईकांनी पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी बुधवार २ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.

Protected Content