कृषीमित्र हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांच्या हितासाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेती आणी शेतकर्‍यांच्या विकासासाठी आयुष्य समर्पित केलेल्या माजी खासदार तथा कृषिमीत्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त यावलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने एक स्तुत्य शेतकरी हिताचा जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. ३ ऑक्टोबर पासुन यावल तालुक्यातील गावोगावी रिक्षाद्वारे ऑडीओ क्लीप वाजवु शेतकऱ्यांची त्यांच्या हक्काविषयी व कायदे विषयक जनजागृती केली जाणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेशवसंत फेगडे यांनी दिली आहे, त्यासाठी यापुर्वीच बाजार समीतीने योग्य त्या पुर्तता केलेल्या आहे.

गेल्या काही दिवसापासुन यावल कृषी उत्पन्न बाजार समिती ही कष्टकरी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या विविध मार्गाने लुबाडणुकीस रोखण्यासाठी अतिश्य महत्वाची व शेतकरी हिताशी निगडीत असे कठोर पावले उचलत असल्याने कष्टकरी शेतकरी वर्गातुन मोठे समाधान व्यक्त कण्यात येत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व सर्व आमचे सर्व संचालक मंडळ सदैव कार्यतत्पर राहणार असल्याचे कृउबाचे सभापती राकेश वसंत फेगडे यांनी आश्वासन दिले आहे. येणाऱ्या काळात यावल कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहे .

Protected Content