दुचाकी अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील दुचाकी अपघातात जखमी झालेल्या ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली होती.

याप्रकरणी चौकशी अंती गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंजुळाबाई संजय राठोड वय ३५ रा. रामदेववाडी ता.जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे मंजुळाबाई संजय राठोड या महिला आपलय परिवारासह वास्तव्याला होत्या. ५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मंजुळाबाई राठोड ह्या पुतण्या निलेश राठोड याच्यासोबत दुचाकीवर बसून नेरीकडून रामदेवावाडी येथे येत असतांना त्यांच्या रस्त्यावर कुत्रे आडवे आले. त्यामुळे त्यांची दुचाकी स्लीप झाली. या अपघातात मंजुळाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत चौकशी अंती अखेर गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.

Protected Content