Home क्राईम धावत्या रेल्वेच्या धक्क्याने तरूणीचा दुदैवी मृत्यू

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने तरूणीचा दुदैवी मृत्यू

0
107

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा येथील २५ वर्षीय तरुणी हि रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दापोरा ते शिरसोलीदरम्यान दोन पुलाजवळ घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.

सुवर्णा पंडित पाटील (वय २५ रा. दापोरा ता. जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. मूळची दापोऱ्यातील असणारी सुवर्णा हि सध्या शिरसोली येथील बहिणीकडे राहत होती. गुरुवारी दि. २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ती शेतात जात होती. त्यावेळी दोनपुलाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना तिला रेल्वेगाडीचा धक्का लागल्याने ती जागीच गतप्राण झाली. तालुका पोलीस स्टेशनला दापोराचे पोलीस पाटील जितेश गवांदे यांनी माहिती दिली. यानंतर पोलीस कर्मचारी हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे, अनिल मोरे आणि धनंजय पाटील यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.


Protected Content

Play sound