आ. शिरीष चौधरींच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मधूस्नेह शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने डोंगर कठोरे येथील अ.ध.विद्यालय ज्यु.कॉलेज, पाडळसे येथील लोक विद्यालय व दुसखेडा येथील दादासो दयाराम देवराम सोनवणे माध्यमिक विद्यालय येथील संस्थाचालक शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.

पूर्वीच्या लोकांना शिक्षणाची कास होती म्हणूनच त्यांनी गावागावांमध्ये शिक्षण संस्था काढून खेडेगावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली या शाळांमधून अनेक मोठे विद्यार्थी घडले की जे विदेशामध्ये मोठ्या पदांवरती तसेच उद्योजक झाले त्यामुळे अशा शिक्षण प्रेमी व्यक्तींविषयी विद्यार्थ्यांना घडविनाऱ्या शिक्षक व आपल्या देशाचे भविष्य यशवंत विद्यार्थ्याचा सन्मान करून ऋण व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अ.ध.विद्यालय ही संस्था सन १९६१ साली मनोहर लहू महाजन, इच्छाराम तुकाराम महाजन, सुरेश लक्ष्मण पाटील, मिठाराम देवाजी राणे, प्रल्हाद यशवंत पाटील,रवींद्र रामकृष्ण राणे यांनी व सहकाऱ्यांनी ही संस्था उभी केली व आजच्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यमान संचालक मंडळ शाळा यशस्वीपणे चालवत आहे संस्थेचे अध्यक्ष संचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याच्या अथक मेहनतीने मागील वर्षी या शाळेला मुख्यमंत्री माझी सूंदर शाळा या उपक्रमात तालुका स्तरावर प्रथम पुरस्कार मिळालेला आहे.
ग्रामीण शिक्षण संस्था संचलित लोक विद्यालय पाडळसे ही संस्था १९६० साली के. एम पाटील व सहकाऱ्यांनी स्थापन केली ही शाळा आज प्रगती पथावर आहे. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासो दयाराम देवराम सोनवणे माध्यमिक विद्यालय दुसखेडा, ही संस्था १९६२ साली दयाराम देवराम सोनवणे, रामशिंग पाटील, व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केली या शाळेतून अनेक नामवंत विद्यार्थी घडले व शाळा प्रगती पथावर आहे.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्था चालक, शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचे सुद्धा सन्मान केला पाहिजे या दृष्टीने मधूस्नेह शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहून संस्था चालक, शिक्षक व यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना संस्कार गीत पुस्तक वाटप करून विद्यार्थ्यांन सोबत गीत गायनाचा आनंद घेतला व मार्गदर्शन केले.यावेळी सोबत लेवा समाज कुटुंब नायक ललितदादा पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रामराव पाटील, सचिव हेमचंद्र इंगळे, संचालक जयंत पाटील, अरुण चौधरी, युवराज पाटील, अनिल चौधरी मुख्याध्यापक समाधान भोई,सुनील फिरके,ग्राम पंचायत सदस्य बापू कोळी,अॅड. सूरज पाटील, प्रशांत तायडे, राजमहहंमंद पठाण,शेखर तायडे, सतीश चौधरी, जितेंद्र पाटील पी पी चौधरी, अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र झांबरे उपाध्यक्ष राजाराम राणे, सचिव दिनकर पाटील, सहसचिव गोपाळ सरोदे, शरद राणे , सुदाम राणे, मधुकर चौधरी, चिंधू झांबरे मुख्याध्यापक नितीन झांबरे, प्राचार्य दिलीप भोळे सरपंच नवाज तडवी पो पाटील राजरत्न आढळे.आशाताई आढळे, राजू आढळे, प्रवीण गाजरे रविंद्र जावळे, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन नितीन सोनवणे संचालक श्री मंगाशेठ सोनवणे, प्रदीप सोनवणे, अशोक पाटील, देविदास पाटील, मुख्याध्यापक दिलीप पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व अन्य मान्यवर उपस्थित होते

Protected Content