यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील मुस्लीम बांधवांच्या वतीने पैगंबर यांची जयंती ईदु मिलाद उल नबी जश्नची मिरवणूक मोठया उत्हासाच्या वातावरणात पार पडली, शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या मिरवणुकीत हजारोच्या संख्येत मुस्लीम बांधवांनी सहभाग घेतला. दरम्यान मुस्लीम बांधवांच्या जश्ने ईद-ए-मिलाद उन सणासाठी शहरातील मुस्लीम बांधवांच्या वतीने मस्जिदवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
यावल शहरातून प्रमुख मार्गाने निघालेल्या मिरणुकीचे समारोप ख्वाजा मस्जिदासह शहरातील विविध मस्जिद मध्ये सामूहिक नमाज पठणाने झाली. यावेळी आमदार शिरीष चौधरी, धनंजय चौधरी, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील व आदींनी या ठिकाणी उपस्थित राहुन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या, कायदा सुव्यवयस्था राखण्याकामी पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शना बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. दरम्यान पैगंबरांचा जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी युवकाच्या वतीने गोड प्रसाद वाटण्यात आले.