कश्मीरच्या दोडा येथे ४० वर्षांनंतर प्रथमच पंतप्रधानांची सभा

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज जम्मू काश्मीरची दोडामध्ये सभा होणार आहे. भाजपाचे जम्मू काश्मीरचे निवडणूक प्रमुख जी. किशन रेड्डी म्हणाले की ४० वर्षांनी पंतप्रधानांची सभा दोडा मध्ये होते आहे. याआधी १९८२ मध्ये सभा झाली होती. दोडा या ठिकाणी सभा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुरुक्षेत्र या ठिकाणी त्यांची पहिली सभा घेतील कारण पुढच्या महिन्यात हरियाणा येथे विधानसभा निवडणूक होणार आहे.

हरियाणा येथील निवडणूक ५ ऑक्टोबरला पार पडणार आहे. तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असल्याने दोडा या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी किश्तवर जिल्ह्यात अतिरेक्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले तर इतर काही जण जखमी झाले. आज पार पडणाऱ्या सभेत पंतप्रधान काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

Protected Content