यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पश्चीम क्षेत्र वनविभागाच्या वतीने गुप्त बातमीच्या आधारा वरून हरिपुरा वनक्षेत्रात कार्यवाही करीत बेवारस सागवान लाकुडच्या पाट्या केल्या जप्त केले आहे. यावलच्या वन विभागाच्या फिरत्या पथकाने कर्तव्यावर असतांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर उप वनसंरक्षक जमीर शेख पश्चीम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपुरा व रोपवन संरक्षण मजुरांसह शासकीय वाहनाने मौजे हरिपूरा ते वड्री रस्त्याने गस्त करीत असताना बेवारस साग चोपट नग लपवलेले दिसून आले.
साग चोपट नग ०५ घ.मी. ०.०८२ अंदाजे मालाची किमत रु. १६६० /- जप्त करून शासकीय वाहनाने मु.वि. केंद्र यावल येथे पावतीने जमा केले, गुन्हे प्रकरणे. प्र. री. क्र. १० / २०२४ अन्वये व.र. हरिपूरा यानी नोंदवीला सदरची कार्यवाही ही जमीर शेख उप वनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव समाधान पाटील सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल, तसेच पश्चीम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे व वनरक्षक हरिपूरा अशरफ तडवी, वनरक्षक सुधीर पटणे, वनरक्षक अक्षय रोकडे व वाहन चालक शरद पाटील यांनी केली. पुढील तपास अशरफ तडवी वनपाल हरीपुरा (अतिरिक्त कार्यभार) हे करीत आहे.