कार-दुचाकी अपघातातील ‘त्या’ जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीचे पेट्रोल संपल्याने मित्राच्या दुचाकीने ट्रिपल सीट जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याची घटना नेरी नाका चौकात घडली होती.  ही घटना 1 जुलै रोजी घडली होती. अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी झाले होते. त्यातील गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान आज रात्री 10 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, सचिन अनिल सोनार (वय-२८) रा. विठ्ठल पेठ हे १ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास महाबळ येथे भाचीला घेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९, ७८७६) ने पांझर पोळकडून जात असतांना त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. त्यानंतर सचिन सोनार याने मित्र पवन गोपाळ बारी आणि रोशन शरद ढाके यांना फोनवरू बोलावून घेतले. त्यानंतर ८.४५ वाजेच्या सुमारास दोघे मित्र दुचाकी( एमएच १९ बीव्ही ००२४) ने ट्रिपल सिटने निघाले. त्यानंतर ट्रिपल सीट नेरी नाका चौकातून पांडे डेअरी चौकाकडे जात असतांना कोंबडी बाजार कडून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ६६५१) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले असून तिघांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यातील पवन बारी यांची प्रकृती गंभीर होती.  आज अखेर पावन बारी या तरुणाचा उपचारादरम्यान आज रात्री 10 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.

Protected Content