दुचाकी चोरटा अखेर जेरबंद; एलसीबीची कारवाई

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक मोटार सायकल चोरी होत आहेत. सदर बाबत गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमी मिळाली की, वरणगाव येथील जाबीर शहा भिकन शहा हा त्याचे साथीदार सह मोटार सायकल चोरी करून त्या कमी पैश्यामध्ये विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी सर्व नेम.स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करून तात्काळ जाबीर शहा याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

त्यावरून नमुद पथक हे साधारण ३ दिवसापासून जाबीर शहा याच्यावर पाळत ठेवून असतांना २८ ऑगस्ट रोजी वरणगाव शहरातील तिरंगा चौकातून ताब्यात घेवून त्यांच्या कडून १) मुक्ताईनगर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क.३७९ मधील हिरो कंपनीची HF डिलक्स RTO NO MH१९DJ७४१२, २) मलकापुर शहर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २९२/२०२४ भादंवि क. ३७९ मधिल होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा पांढऱ्या रंगाची RTO NO.MH२८AX११४१, ३) मध्य प्रदेशातील वऱ्हाणपुर जिल्ह्यातील खकनार पो.स्टे गु.र.नं. ५१८/२०२४ भा.न्या.सं.३०३ (२) मधिल रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट लाल व काळया रंगाची RTO NO.MP६८MG९६३८, ४) होन्डा कंपनीची युनिकॉर्न ग्रे रंगाची RTO NO.MH१२QB०३२७ अश्या एकुण १,५५,०००/- रु. किं.च्या ४ मोटार सायकल जप्त करून पुढील योग्य त्या कारवाई करीता मुक्ताईनगर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क.३७९ या गुन्ह्यात मुक्ताईनगर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Protected Content