नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस पार्टी म्हणजेच वायएसआर काँग्रेसच्या दोन राज्यसभा खासदारांनी आज २९ ऑगस्ट गुरुवार रोजी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा दिला. मोपीदेवी वेंकटरामन आणि बेदा मस्तान राव यांनी आपले राजीनामे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
आंध्रप्रदेशातील विधानसभा निवडणूकीबरोबरच लोकसभा निवडणूकीत वायएसआरसीपीला हा मोठा धक्का बसला. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. विधानसभेत पक्षाची सत्ता गेली आणि लोकसभेत ४ खासदारच निवडून आले. आता या खासदारांच्या जाण्याने वायएसआरसीपीकडे राज्यसभेत ९ खासदार शिल्लक आहे. दोन्ही नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.