जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील खोटे नगरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३१ जुलै रोजी ही मुलगी घरात कोणालाही काहीही न सांगता नाशिक येथे तिच्या ओळखीच्या मुलाला भेटण्यासाठी गेली. परंतु त्या मुलाविरुद्ध मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे त्याने मुलाने तीला त्याच्याकडे न ठेवता तीला पुन्हा जळगावला पाठवून दिले. मात्र अद्याप देखील ती मुलगी तिच्या घरी परतलेली नसून तिच्याबद्दल माहिती देखील मिळून आलेली नाही. दरम्यान, त्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी अमिष दाखवून पळवून नेले अशी प्रकार पिडीत मुलींच्या पालकांनी जळगाव तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पिडीत आईने तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी २६ ऑगस्ट रोजी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.