घरफोडी करून चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न; १७ हजाराची रोकड लांबविली

निवृत्ती नगरातील घटना : जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निवृत्ती नगरात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी असतांना बाहेरगावाहून आलेल्या घरमालकाने चोरट्यांना घराला बाहेरून कडी लावून पकडण्याच्या प्रयत्नात असतांना चोरटे घराचा मागचा दरवाजा तोडून पसार झाल्याची घटना मध्यरात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, “दिपक अरविंद बसेर (वय-४१) रा. कार्तीक स्वामी मंदीर निवृत्ती नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. फार्मा कंपनीत ते नोकरीला आहे. रविवारी १२ जून रोजी त्याच्या काकाचा वाढदिवस असल्याने सकाळी ६ वाजता घर बंद करून परिवारासह औरंगाबाद येथे गेले होते.

वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून दिपक हे कुटुंबियांसह सोमवारी १३ जून रोजी मध्यरात्री दीड वाजता निवृत्ती नगरात घरी आले. त्यावेळी त्यांना घराचे मेन गेटचे कुलूप तोडलेले दिसून आले. तर घराचा मुख्य दरवाजा देखील कडी कोयंडा तोडलेले दिसले. दरम्यान, त्यांची पत्नीने घरात कसलातरी आवाज येत असल्याचे सांगितले. दिपक यांनी “घराचा दरवाजाची कडी बाहेरून लावून कोण आहे असे विचारले असता चोरटे घरातील लाईट बंद करून चोरी करत होते. दिपक यांनी आवाज दिल्यावर चोरटे भांबावले. मी पोलीसांना फोन करतो.” असे सांगितल्यावर त्यांनी आतून “पोलीसांनी बोलावू नका” असे सांगू लागले. त्यानंतर यातील चोरट्यांनी घराच्या मागच्या दरवाजा तोडून तीन चोरटे पसार झाले.

शेजारी राहणाऱ्या वाचमन छगन सबलाल पाटील यांनी चोरट्यांचा पाठलाग केला परंतू तिघे चोरटे पळण्यात यशस्वी झाले, चोरट्यांनी घरात सर्व सामान अस्तव्यस्त करून लोखंडी कपाटातून १७ हजाराची रोकड लांबविली होती. याप्रकरणी दिपक बसेर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी संतोष भंडारे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!