बंद घर फोडून ५६ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून ३० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण ५६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद अशोक चित्रकथे वय ४१ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारास वास्तव्याला आहेत. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उघडून घरातून ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकण ५६ हजारांची ऐवज चोरून नेला. हा प्रकारा सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रमोद चित्रकथे यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Protected Content