उंटावद वि.का.सो. सचिव संजय महाजन यांचा सेवापुर्ती कार्यक्रम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील उंटावद विविध कार्येकारी सहकारी सोसायटीचे सचिव व देवगाव ता.चोपडा येथील रहीवाशी संजय दिनकर महाजन हे प्रदिर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले असुन जिल्हा परिषदच्या शाळेत झालेल्या सेवापुर्वी कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आले.

सचिव या पदावर संजय महाजन यांनी आपल्या सेवेच्या कार्यकाळात दरम्यान ७ वर्ष साकळी १ वर्षे किनगाव २ वर्षे आडगाव ४ वर्षे न्हावी १ वर्षे फैजपूर १४ वर्षे कोळन्हावी व बरीचशी वर्षे उंटावद वि.का.सोसायटीत सेवा दिली एकुण ३७ वर्षे ६ महीने सेवेचा प्रदिर्घ अनुभव असल्याने व व्यवहारीक तत्पर कार्ये असल्याने शेतकरी वर्गाचाही त्यांच्यावर विश्वास होता उंटावद वि.का.सोसा.च्या वतीने संजय महाजन यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.

जि.प.मराठी शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्येक्रमाला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व संगीतम ट्रँव्हलचे सर्वेसर्वा विनोदकुमार पाटील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नरेन्द्र नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंन्द्र पवार गटाचे चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, रामचंन्द्र चौधरी, किनगावचे माजी चेअरमन टीकाराम चौधरी, माजी प.स.सदस्य प्रशांत भगवान पाटील, अँड.देवकांत पाटील, किनगाव वि.का.सोसा.चे चेअरमन विनोदकुमार देशमुख, गोकुळ चौधरी, नायगाव वि.का.सोसा.चे चेअरमन दगडू पाटील, डोणगावचे चेअरमन साहेबराव पाटील, व्हा.चेअरमन सुरेखा पाटील, साकळी येथील लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील, चिंचोलीचे सरपंच पती अनिल साळुंके, विरावलीचे पवन पाटील, किनगाव माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन निळकंठ पाटील, सेवानिवृत्त ग्रामसेवक गुरूदास चौधरी, सेवानिवृत्त सचिव सुपडू भारंबे, रविन्द्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नायगाव येथील शांताराम पाटील, चंन्द्रकांन्त कोळी, डांभुर्णीचे गोकुळ कोळी, उंटावदचे सरपंच छोटु भिल, उपसरपंच भावना पाटील व सर्व ग्रा.प.सदस्य इ. सह विविध क्षेत्रातील मान्यंवर उपस्थीत होते. या कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी वि.का.सोसा.चे चेअरमन शशीकांत पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्येक्रमाचे सुत्र संचालन मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विवेक पाटील यांनी केले.

Protected Content