प्रचंड जल्लोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लखपती दिदी’ मेळाव्याच्या ठिकाणी दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लखपती दिदी या मेळाव्याच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले असून उपस्थितांनी याप्रसंगी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव विमानतळाच्या समोर आज भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ते लखपती दिदी या योजनेतील लाभाथ महिलांशी संवाद साधणार आहेत. तसेच याप्रसंगी ते उपस्थितांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

आज सकाळी नरेंद्र मोदी यांचे छत्रपती संभाजीमहाराज नगर येथील विमानतळावर आगमन झाले. यानंतर हवाईदलाच्या विशेष हेलीकॉप्टरमधून पंतप्रधानांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते लखपती दिदी मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Protected Content