पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जळगावात आगमन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखपती दिदी या मेळाव्याच्या निमित्ताने आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांचे जळगावात आगमन झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव विमानतळाच्या समोर आज भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ते लखपती दिदी या योजनेतील लाभाथ महिलांशी संवाद साधणार आहेत. तसेच याप्रसंगी ते उपस्थितांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. या मेळाव्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला असून एक लाखांपेक्षा जास्त स्त्री-पुरूषांची याला उपस्थिती राहिल असा अंदाज आहे. या मेळाव्यासाठी गेल्या अनेक दिया मेळाव्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती.

आज सकाळी नरेंद्र मोदी यांचे छत्रपती संभाजीमहाराज नगर येथील विमानतळावर आगमन झाले. यानंतर हवाईदलाच्या विशेष हेलीकॉप्टरमधून पंतप्रधानांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. याप्रसंगी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, ना. गिरीशभाऊ महाजन, ना. गुलाबराव पाटील, ना. अनिल पाटील आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Protected Content