किरकोळ कारणावरून तरूणाला लोखंडी पाईपने मारहाण

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील रामपेठ भागात वहिनीला शेतात मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरूणाला तीन जणांनी डोक्यात लोखंडी पाईट टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान हरचंद वाघ वय ३८ रा. रामपेठ वरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. समाधान वाघ याच्या भावाच्या पत्नीला शेतात ईश्वर देवचंद धनगर आणि त्यांच्या मुलांनी मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समाधान हा ईश्वर देवचंद धनगर याच्याकडे गेला होता. याचा राग आल्याने ईश्वर देवचंद धनगर, सागर ईश्वर धनगर आणि कृष्णा ईश्वर धनगर सर्व रा. रामपेठ, वरणगाव यांनी समाधान याला लोखंडी पाईपाने मारहाण केली तर एकाने त्यांच्या डोक्यात पाईप टाकून गंभीर दुखापत केली. याप्रकरण समाधान वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ईश्वर देवचंद धनगर, सागर ईश्वर धनगर आणि कृष्णा ईश्वर धनगर सर्व रा. रामपेठ वरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content