अंतुर्ली रांजणे वि.का.स. सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अंतुर्ली रांजणे वि. का. स. सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी दाजभाऊ पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. व्हॉईस चेअरमनपदी विमल पाटील यांची निवड झाली आहे. चेअरमन पदासाठी शिवाजी पाटील यांचे नाव संस्थेचे संचालक सचिन पाटील यांनी सुचवले तर छोटू पाटील यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हॉईस चेअरमन पदासाठी विमल पाटील यांचे नाव आबा पाटील यांनी सुचवले तर सुभाष सोनवणे यांनी अनुमोदन दिले.


सदर निवडणूक सब रजिस्टर ऑफिसचे एस. पी. महाजन यांच्या अध्यक्षतेत पार पडली तर संस्थेचे सचिव कृष्णकांत भावसार यांनी निवडणूक कामात सहकार्य केले. सभेस सचिन पाटील, छोटू पाटील, सुभाष सोनवणे, देवदास पवार, विमल पाटील, मालती पाटील, किशोर पाटील, आबा पाटील, भास्कर सोनवणे, नारायण पाटील उपस्थित होते. सदर निवडीबद्दल मदत पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी अभिनंदन केले.

Protected Content