पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरील अमानवी अत्याचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली असून याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निषेध आंदोलन करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. याप्रसंगी जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला.
बदलापूर (मुंबई) येथे साडेतीन वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध व्यक्त करत २१ रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यालयापासून वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सदरचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टरबुज लावलेला प्रतिकात्मक पुतळा राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत अल्पवयीन मुलींसह मोर्चात उपस्थितीतांनी जोडे मारुन पेटवून दिला. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल गजु काळे यांनी ताब्यात घेतला. मोर्चात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, अॅड. अभय पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, अभिषेक खंडेलवाल, तिलोत्तमा मौर्य, कुंदन पंड्या, जयश्री येवले, अॅड. दिपक पाटील, भरत खंडेलवाल, अभिषेक खंडेलवाल, नाना वाघ, नंदु पाटील यांचेसह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या दुष्कर्माच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरून आक्रोश मोर्चा काढत घटने बाबत असंतोष व्यक्त करण्यात आला. सदरचा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टरबुज बांधुन प्रतिकात्मक पुतळ्यास अल्पवयीन मुलींसह उपस्थितीतांनी जोडे मारत भर चौकात फुंकण्यात आला. तसे निषेधार्थ निवेदन तहसिलदार विजय बनसोडे व पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना देण्यात आले. तहसिलदार यांच्या वतीने नायब तहसिलदार विनोद कुमावत यांनी स्विकारले.