यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील यांनी दिला राजीनामा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल गोविंदा पाटील यांनी चौदा महीन्यांच्या कारभारानंतर आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला असून सभापती पदासाठी कृषी उपन्न बाजार समितीत खांदेपालट होणार असल्याचे वृत्त आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा प्रणीत महायुतीच्या पॅनलला १९ पैकी १७ जागांवर संचालक विजयी होवुन स्पष्ठ बहुमत मिळाले होते. दरम्यान सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षा अंतर्गत ठरल्याप्रमाणे एक वर्ष दोन महिन्या नंतर विद्यमान सभापती हर्षल गोविंदा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज दिनांक २० ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीनंतर सभापती हर्षल पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा सचिव स्वप्नील सोनवणे यांच्याकडे सोपविलाआहे.

सदरचा राजीनामा सहकार विभागाचे जिल्हा निबंधक जळगाव यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भावी सभापती खांदेपालट होणार असल्याचे सत्ताधारी महायुती च्या सुत्रांकड्डन बोलले जात आहे . दरम्यान पुढील सभापती निवड होईपर्यंत हर्षल पाटील हेच सभापतीपदाचा कारभार सांभाळतील .

Protected Content