Home Cities जळगाव सुप्रिया सुळेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी : ‘बुलंद छावा’ची मागणी

सुप्रिया सुळेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी : ‘बुलंद छावा’ची मागणी

0
56

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी बुलंद छावा परिषदेच्या वतीने त्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या अलीकडेच जळगाव येथे झालेल्या दौऱ्यात बुलंद छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यात सुप्रियाताई सुळे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर निवेदन सुप्रियाताई सुळे यांना देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह रवी देशमुख, प्रा. सुनील गरूड, योगेश पाटील, नाना महाले, प्रशांत पवार, पंकज तनपुरे, अशोक अरसूड, प्रमोद तायडे, गोपाळ सोनवणे, सोनू पाटील, गणेश पाटील, आकाश हिवाळे, देविदास चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound