मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी, सिंधी कलाकार संगम आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “विभाजन विभाषिका स्मृती दिवस” सिंधी भवन येथे १५ ऑगस्ट गुरूवार रोजी साजरा करण्यात आला. यावेळी नव भारतीयांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पाकिस्तानातील अत्याचारांची कहाणी उलगडली गेली.
विभाजनाच्या जखमांवर फुंकर घालत पाकिस्तानातून आलेल्या ५४ सिंधी हिंदूंनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अखेर भारताच्या कुशीत आश्रय घेतला आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सीएए कायद्याच्या माध्यमातून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. या कार्यक्रमात या नव भारतीयांनी कृतज्ञतेने आपल्या भावना व्यक्त करताना “आता आम्ही आणि आमचा धर्म भारत मातेच्या कुशीत सुरक्षित आहोत,” अस मनोगत त्यांनी व्यक्त केले.
“भारताच्या कुशीतच आपला धर्म सुरक्षित आहे,” असं सांगताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रकाश देवानी, अनित कुमार आसानी आणि दिलीप हुंदलानी यांसारख्या नव भारतीयांनी पाकिस्तानातील जाचक जीवनाची कहाणी रेखाटली. त्यांनी सांगितलं की, “पाकिस्तानात अल्पसंख्याकांना सतत छळ, खंडणी, आणि धर्मांतराचा त्रास सहन करावा लागतो. हिंदू मुलींचं जबरदस्तीने धर्मांतर केले जाते.