नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना जाहीर करण्यात आली. या नव्या योजनेनुसार पुणे शहरातील शनिवारवाड्यासह पुणे जिल्ह्यातील एकूण ५ ऐतिहासिक वारसा स्थळ आता दत्तक घेता येणार आहेत. पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ही नवी योजना सुरू करण्यात आली.
या योजनेचे नाव अॅडॉप्ट अ हेरिटेज योजना असे आहे. वारसा स्थळांची नियमित देखभाल तसेच संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी वारसा स्थळे संस्थेला दत्तक देण्याची केंद्राची नवी योजना असणार आहे. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, लोहगड, कार्ला लेणी आणि भाजे लेणी यांचा समावेश असणार आहे.