आपत्ती व्यवस्थापन विषयक व्यापक जगजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आज दि. 14 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता आपत्ती व्यवस्थापन विषयक व्यापक जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन – एक धाव सुरक्षेची हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. मिनी मॅरेथॉन स्पर्धेत निवासी उपजिल्हाधिकारी, राजेंद्र पाटोळे, उपजिल्हाधिकारी गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी रवि नाईक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नरवीरसिंह रावळ, एनसीसी अधिकारी, एनएसएस अधिकारी आणि जिल्हास्तरीय विविध आपदा मित्र/सखी, एन.एस.एस., स्वयसेवक एन.सी.सी. विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला व पुरुष होमगार्डसह सुमारे १७५ धावक सहभागी झालेले होते.

Protected Content