भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |शहराजवळील साक्री फाट्याजवळ बांधकामाचे उर्वरित पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करत मारहाण करून जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना 30 जुलै रोजी घडली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप रामदास सुरवाडे वय-43 रा. सुभाष नगर, भुसावळ यांनी घराचे बांधकाम केल्यामुळे विजय रामदास अवसरमल रा. खडका ता. भुसावळ याला बांधकाम करण्यासाठी 5 लाख 25 हजार रुपये दिले होते. परंतु बांधकाम हे 4 लाख 25 हजार रुपयांचे झाले आहेत. त्यामुळे उर्वरित पैसे मागितल्याच्या कारणावरून 30 जुलै रोजी सकाळी 9 वाजता संशयित विजय अवसरमल याने संदीप सुरवाडे यांना शिवीगाळ करत हातावर मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ तेजस पारस्कर करीत आहे.