कोरोना : राज्यातील सर्व शाळा-कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद ; राज्य सरकारचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) देशभरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल २२ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच, राज्यातील मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या सहा ठिकाणच्या जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा , राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आहे.

Protected Content