आम आदमी पक्ष विधानसभा निवडणूकीत ‘इतक्या’ जागा लढवणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आम आदमी पक्ष राज्यातील विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील ३६ जागा लढण्याची तयारी आम आदमी पक्षाने केली असल्याची माहिती, पक्षाच्या नेत्या प्रिती शर्मा यांनी दिली आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शर्मा यांनी आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पाठीवर इंडिया आघाडी म्हणून सर्वच विरोधी पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष महाराष्ट्रातील निवडणूक हा स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात आम आदमी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये माहिती देखील देण्यात आली. या वेळी महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर देखील पक्षाची भूमिका प्रिती शर्मा यांनी स्पष्ट केली.

Protected Content