जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिंगरोड वरील लोकमान्य हाउसिंग सोसायटी येथील वृद्ध महिलेच्या बेडरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश करत घरातून एकुण ३ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता समोर आली याप्रकरणी सायंकाळी सात वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, शशिकला कांतीलाल कटारिया वय-६४, रा. लोकमान्य हाउसिंग सोसायटी, रिंगरोड, जळगाव या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव आहे. रविवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असताना आज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीची ग्रील तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर वृद्ध महिलेने सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे हे करीत आहे..