पाऊसाच्या पाण्यामुळे संपूर्ण यावल शहरात खड्डेच खड्डे; प्रशासनाच्या कामाची पोलखोल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यात सर्वत्र पडलेल्या पाऊसाच्या पाण्याने शहरातील व शहराला जोडलेल्या प्रमुख रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या प्रमुख रस्त्यावरील पडलेल्या खड्डयांनी ठेकेदार व प्रशासनाच्या गुणवत्तेची पोलखोल केली असून रस्त्यावंर पडलेल्या खड्डयांचा अंदाज घेतांना वाहनधारकांना वाहन चालवितांना जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागत आहे.

यावल शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपामुन वेगवान पावसाची रिपरिप सुरू आहे. यावल तालुक्यास जोडलेला शेळगाव बॅरज हा मध्यम प्रकल्प धरण प्रथम पुर्ण क्षमते भरलेला असुन धरणाचे सर्व १८ दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आले आहे व त्यातुन पाण्याचा विसर्ग वेगाने सुरू आहे. दरम्यान मागील दोन आठवडयापासुन सुरू असलेल्या या पावसाने यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या गुणवत्तेची पोलखोल केली आहे. त्याच बरोबर यावल शहराला जोडल्या गेलेल्या राज्य महामार्गासह यावल भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्याची देखील दयनिय अवस्था झाली आहे.

हा रस्ता देखील खड्डेमय झाले असल्याने वाहन धारकांना खुड्डयात पावसाचे पाणी तुंबुण भरल्याने खड्डयांचा अंदाज घेता येत नसल्याने वाहनाचे अपघात होत आहे. तरी यावल सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य महामार्ग विभाग व यावल नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या रस्त्यांसाठी योग्य पाऊल उचलुन थातुर मातुर दुरुस्ती न करता चांगल्या प्रकारे या खड्डयांची दुरुस्ती करून नागरिक व वाहनधारकांना होणाऱ्या अपघात आदी समस्यांपासून रक्षण करावे अशी मागणी होत आहे.

Protected Content