कंपनीतून दीड लाख रुपये किमतीचे लोखंडी दरवाजांची चोरी; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | लोखंडी दरवाजे तयार करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या संशयित परेश अरुण बडगुजर (रा. सुप्रिम कॉलनी) या कामगाराने कंपनीतून दीडलाख रुपयांचे दरवाजे तयार करण्याचे साहित्य लंपास केले. ही घटना १७ जुलै ते ३० जुलै दरम्यान, एमआयडीतील इनफिनिटी इंटरप्राईजेस प्रा. लि. कंपनीत घडली. याप्रकरणी कामगाराविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरातील सी सेक्टरमधील इनफिनिटी इंटरप्राईजेस प्रा. लि. कंपनी असून या कंपनीत जितेंद्र आनंदा पाटील (वय ३५, रा. शिवकॉलनी) हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. दि. १७ जुलै ते दि. ३० जुलै दरम्यान, वेळोवेळी कंपनीत काम करणारा कामगार परेश बडगुजर याने कंपनीत लोखंडी दरवाजे तयार करण्यासाठी लागणारे १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर कंपनीचे मॅनेजर जितेेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित परेश अरुण बडगुजर रा. सुप्रिम कॉलनी याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

Protected Content