रेन हार्व्हेस्टिंग प्रकल्प राबविणारे पातोंडा प्रा.आ.केंद्र जिल्ह्यात एकमेव

अमळनेर:-लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी l जगभरात पाणी आडवा पाणी वाचवाचा संदेश दिला जातो.मात्र त्याच्यावर कृती ही बोटावर मोजण्या इतकीच असते.मात्र तालुक्यातील पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील यांनी पाणी आडवा पाणी वाचवा हा संदेश शासकीय इमारतीवर लागू कसा करता येईल यासाठी शासकीय पातळीवर पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन बांधण्यात आलेल्या सात हजार चौरस फुटाच्या इमारतीवर रेन हार्व्हेस्टिंग प्रोजेक्ट राबवण्याचा संकल्प करून त्यांनी जिल्ह्यात एकमेव रेन हार्व्हेस्टिंग प्रकल्प राबवणारे पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव आणण्यात घनश्याम पाटील यांचा मोलाचा वाटा ठरला आहे.


नवीन बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशासकीय इमारत त्यासोबतच सहा कर्मचारी निवासस्थान इमारती यांच्या छतावरील पावसाळ्यात येणारे पाणी अडवण्यासाठी रेन हार्व्हेस्टिंग प्रकल्प तसेच इमारतीचे विदुयत वीज बील टाळण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याची संकल्पना घनश्याम पाटील यांनी करून त्यासाठी स्वतः शासकीय पातळीवर सतत योग्य तो पाठपुरावा करून आज त्यांच्या कार्याला यश आलेले आहे आणि पावसाचे सर्व कुपनलिकेच्या माध्यमातून पाणी गेल्या वर्षेभरापासून जमिनीत जिरत आहे.त्यासाठी त्यांना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी वर्ग,कंत्राटदार अंबिकाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.तसेच घनश्याम पाटील यांनी विहीर,कूपनलिका, रिचार्ज शॉप,नाला खोलीकरण, ग्याबियन बंधारा, जलयुक्त शिवार अभियानात गावाचे नाव समाविष्ट करून आणि प्रशिक्षण घेऊन आणि त्याच्या निधीसाठी सरकारी कार्यालयात सतत चकरा मारुन निधीसाठी तरतूद करून घेतली होती.तसेच गावात त्यांच्या माध्यमातून दोन हजार वृक्षारोपण होऊन आज वृक्ष डेरेदाखल उभे आहेत.यासाठी त्यांना प्रशासकीय अधिकारी कपिल पवार यांचे मार्गदर्शन मिळत असते.

पातोंडा गावात झालेल्या अनेक भौगोलिक विकासात त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या ह्या कृतीचे मंत्री अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ सह,डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यातून नेहमीच कौतुक केले जात आहे.

Protected Content