जामनेर येथे विविध मागण्यासाठी मविआचे धरणे आंदोलन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर येथे तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस महाविकास आघाडी तर्फे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले असून याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा, केळी-ज्वारी-मका पिकांना हमीभाव द्यावा, दूध उत्पादक शेतकऱ्याला अनुदान मिळावे, केळीसह इतर पिकाची पिक विमा रक्कम देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करून त्यांना मदत द्यावी, पोलीस यंत्रणा मजबूत करावी, जामनेर शहरातील अतिक्रमण भारताचे पुनर्वसन करावे, जामनेर शहरात सीसीटीव्ही कॅमेरा चालू करण्यात यावे, शालेय मुलींसाठी बसेसची व्यवस्था करावी, धन्य पूर्ण बंद करावे, जामनेर रुग्णालय अद्यावत करावा, आदिवासी बांधवांना वेठीस धरू नये, हल्ल्याच्या मुख्य सूत्रधार शोध लावावा अशा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेनेचे ॲड. ज्ञानेश्वर बोरसे डी. के. पाटील, राहुल पाटील, डॉ. मनोहर पाटील, डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

Protected Content