Home धर्म-समाज शिवसेना धावली प्रवाशांच्या मदतीला

शिवसेना धावली प्रवाशांच्या मदतीला

0
31
shivasena fruts
shivasena fruts

shivasena fruts

पाचोरा प्रतिनिधी । मुंबई येथे मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाल्या आहेत. प्रवांशाची गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी शिवसेना यांच्याकडून प्रवाशांना मदत करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथील शिवसेने कडून प्रवाशांना फळ, चहा-बिस्किट वाटप करण्यात येत असून, त्यांना मेडीकल सेवा देण्यात येत आहे. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, उद्योगपती मुकंद बिल्दीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावकर, युवासेना शहरप्रमुख संदीप पाटील, दादा चौधरी, सतिष चेडे, रेहमान तडवी, आनंद पगारे, गंगाराम पाटील, जितेंद्र पाटील, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपूत, चेतन सपकाळे, आण्णा चौधरी, विजय भोई, अजय पाटील व आदी शिवसैनिक उपस्थित होते. तसेच यावेळी प्रवाशांनी आभार व्यक्त करत कौतुक केले.


Protected Content

Play sound