जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीसात तक्रार देवून गुन्हा दाखल केल्याच्या रागातून आरएमएस कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेला फोनवरून शिवीगाळ करत जीवेठार मरण्याची दिल्याची घटना शुक्रवार २६ जुलै रोजी समोर आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील आरएमएस कॉलनीत रेखा सुभाष पाटील या महिला वास्तव्यास आहे. सुवर्णा कृष्णा पाटील, कृष्णा पाटील (रा. संत मीराबाई नगर), वंदना अजय पाटील, अजय पाटील यांच्याविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा राग मनात ठेवून काहीही कारण नसतांना शुक्रवारी २६ रोजी दुपारी ३ वाजता महिलेच्या मोबाईलवर कॉल करून चौघांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या नातेवाईक यांना भेटून आणि फोनवरून त्या महिलेविषयी वाईटसाईट सांगून त्याची बदनामी केली. हा त्रास असह्य झाल्याने महिलेने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.