आघाडीत बिघाडी; मुक्ताईनगरच्या जागेवर काँग्रेसने ठोकला दावा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथे आज २८ जुलै रविवार रोजी मुक्ताईनगर विधानसभेच्या आढावा बैठकीसाठी मुक्ताईनगर विधान सभा निरीक्षक व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ज्ञानेश्वर भाऊ कोळी बैठक पार पाडली. या बैठकीत मुक्ताईनगर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली व सर्वांनी एक मुखाने ही मागणी केली की मुक्ताईनगर विधानसभाची जागा काँग्रेसला मिळावी.

सदर बैठकीचे अध्यक्ष स्थानी प्रदेश काँग्रेस सदस्य डॉ. जगदीशदादा पाटील तर याप्रसंगी जळगांव जिल्हा माजी अध्यक्ष उदय पाटील, व्ही. जे. एन. टी. सेलचे प्रदेश प्रवक्ते एडवोकेट अरविंद जी गोसावी, व्ही. जी. एन. टी. सेल जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव साहेब, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष भारत पाटील, रवींद्रजी कांडेलकर, गुलाबराव पाटील महाराज, मनीषा कांडेलकर, प्रा. सुभाष पाटील, नामदेवराव भोई, राजेंद्र जाधव, निखिल चौधरी, बाळूभाऊ कांडेलकर, रमेश जाधव, जे. व्ही. नाईक, हिरासिंग चव्हाण, गौरव पाटील, सचलाल बोराळे व इतर कार्यकर्ते हजर होते.

मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोठया नेत्या रोहिणी खडसे या उत्सुक आहे. मागील वर्षांपासून त्या प्रचाराची तयारी करत आहे आणि विधानसभा निवडणूकीसाठी उत्सुक आहे. पण आता या मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने दावा ठोकला असल्याकारणाने पुढे या मतदारसंघात कोणते चित्र बघायला मिळते ते पाहणे महत्वाचे असेल.

Protected Content