अर्थसंकल्पात आयकराबाबत महत्वाचा बदल : जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात आयकराबाबत महत्वाचा बदल करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्र शासनाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यात त्यांनी विविध महत्वाच्या घोषणा केली. यातील सर्वांच्या जिव्हाळ्याची एक घोषणा आयकराबाबत करण्यात आली आहे. यानुसार, आता ३ लाखापर्यंतच्या उत्पनावर कर लागणार नाही, ३ ते ७ लाखापर्यंतच्या उत्पनावर ५ टक्के कर लागणार आहे. ७ ते १० लाखापर्यंत उत्पन्नावर १० टक्के कर लागेल, १० ते १२ लाखापर्यंत उत्पन्नावर १५ टक्के कर, १२ ते १५ लाख उत्पन्नावर २० टक्के कर लागणार आहे. तर १५ लाखाहून अधिक उत्पन्न असणार्‍यांना सरसकट ३० टक्के कर लागणार आहे.

दरम्यान, नवीन कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ही ५० हजारांवरून ७५ हजार इतकी करण्यात आली आहे. यामुळे देशभरातील आयकरदात्यांसाठी अर्थमंत्र्यांनी आज महत्वाची घोषणा केल्याचे मानले जात आहे.

Protected Content