धक्कादायक ! नशिराबाद अंगणवाडीतील पोषण आहाराच्या पकिटात मृत उंदराचे पिल्लू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावातील नशिराबाद येथे अंगणवाडीतून पोषण आहाराच्या पाकिटात मेलेले उंदराचे पिल्लू सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलपा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंगणवाडी पोषण आहाराच्या मिक्स तांदूळाच्या पाकिटात मेलेल्या उंदीराचे पिल्लू आढळून आले आहे. हा प्रकार स्वयंपाकादरम्यान गृहिणी तेजस्वी देवरे यांच्या लक्षात आला.

पोषण आहाराच्या पाकिटामध्ये उंदीर सापडल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापची लाट पसरली आहे. या प्रकरणी आता काय कारवाई होते? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संबंधित प्रकरण तापलं तर या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली जाऊ शकते किंवा एखाद्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

Protected Content