धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।खान्देशातील प्रवाशांच्याम मागणीनुसार नुकतीच दादर-भुसावळ ही गाडी सुरूवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने शुक्रवारी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दादरहून भुसावळकडे जात असतांना धरणगाव येथे भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने रेल्वे इंजिन व लोको पायटल यांचे पुष्पहार देवून पेढे वाटप करून स्वागत करण्यात आला.


त्याप्रसंगी भाजपचे नेते पी.सी.आबा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष ॲड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पुनिलाल महाजन, शहराध्यक्ष दिलीप महाजन, शिवसेना शहराध्यक्ष विलास महाजन, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, भाजपचे गटनेते कैलास माळी, ऍड.कन्हैया रायपुरकर, चंदन पाटील, सुनिल चौधरी, रावसाहेब सोनवणे, बालू जाधव, बुटा पाटील, सचिन पाटील, पवन महाजन, गोपाल पाटील, शरद भोई, विनायक महाजन, रवि मराठे, किरण महाजन, अहमद पठाण, सोनू महाजन, जुलाल भोई, निर्दोष पवार, पुंडलिक पाटील, जैन समाजाचे सचीव श्रेयांश जैन, रेखाताई पाटील, दिक्षा गायकवाड इत्यादी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


