आषाढी एकादशीनिमित्त जे. टी. महाजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील व्यास शिक्षण मंडळ यावल व्दारे संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कुलच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्त दिंडी सोहळ्याचे विद्यार्थ्यांच्या सहभागाने सुन्दर असे आयोजन करण्यात आले. यावल येथे व्यास शिक्षण मंडळ यावल व्दारे संचलीत जे टी महाजन इंग्लीश स्कुलच्या वतीने यात इ. ५वी ते१० वीच्या विदयार्थ्यांनी आर्कषक वस्त्र परिधान करून या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला. यात विदयार्थ्यांनी जनाबाई, मुक्ताबाई, विठ्ठल, रुखमणी, मुक्ताबाई, मीराबाई, ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपान इत्यादी संताच्या वेशभूषा साकारल्या होत्या.

शाळेच्या प्राचार्या रंजन महाजन व प्राचार्य ज्ञानेश्वर मावळे यांच्या हस्ते दिंडीच्या सुरूवातीस पालखीचे पुजन करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. दिंडी शाळेच्या परिसरातून निघुन शहरातील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी स्कुलच्या विदयार्थ्यांनी सादर केलेल्या लेझिम, टाळ, फुगडी पावली खेळून गावातील दिंडी सोहळ्याची यात्रा पाहणाऱ्या नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.या आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्कुलच्या वतीने आयोजित दिंडीसह सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या भक्तीमय आनंददायी व उत्साहाच्या अशा वातावरणात पार पाडण्यासाठी जेटी महाजन इंग्लिश शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

Protected Content