कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू, २ जखमी

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वैजापूर-माळीवाडा रोडवर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शन करून कारने घरी परतणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. शनिवार पहाटे वैजापूर रोडवरील फतियाबाद टाकळीजवळ हा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे-सोलापूर हायवे रस्त्यावरील माळीवाडा-फातियाबाद येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. राजू उचित, पत्नी अलका उचित आणि मुलगा अर्जुन उचित अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरधाव कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या अपघातात मृत झालेले तिघेही जण बजाजनगर भागात राहत असल्याची माहिती आहे. कन्नडवरून छत्रपती संभाजीनगरकडे येताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अलकाबाई राजू उचित, राजू आत्माराम उचित आणि अर्जुन राजू उचित या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचा मृत्यू झाल्याने उचित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिघांच्या मृत्यूने बजाजनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दुचाकींच्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना बिडकीनजवळील कौडगाव-ताहेरपूर परिसरातील रेणुकामाता मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली. अशोक भालेराव व नामदेव डफाळ, अशी मृतांची नावे आहेत. तर नंदाबाई लहू पाखरे व अनिता डफाळ या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

Protected Content