नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपाध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी शुक्रवारी संघटनेचे प्रदेश प्रभारी व सहप्रभारी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. वरिष्ठ नेते व्ही. मुरलीधर राव यांच्या जागी उत्तर प्रदेशचे महेंद्रसिंह यांच्याकडे मध्य प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी राहील. महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांच्याकडे बिहारची तर माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळची जबाबदारी दिली. तर राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे मणिपूर प्रभारीपद देण्यात आले आहे. दिल्लीचे सतीश उपाध्याय मध्य प्रदेशचे सहप्रभारी असतील. राजस्थान भाजपचे माजी अध्यक्ष सतीश पुनिया यांच्याकडे हरियाणाची धुरा असेल. हरियाणात याच वर्षी विधानसभा निवडणूक आहे.
राष्ट्रीय सरचिटणीस राधामोहनदास अग्रवाल कर्नाटक, विनोद तावडे-बिहार, तरुण चुघ जम्मू-काश्मीर, लडाख, दुष्यंत गौतम उत्तराखंडच्या प्रभारीपदी कायम राहतील. आशिष सूद -गोवा, श्रीकांत शर्मा-हिमाचल, लक्ष्मीकांत वाजपेयी-झारखंड, विजयपाल तोमर-ओडिशाचे प्रभारी असतील. आमदार श्रीकांत शर्मा हिमाचल प्रदेशचे प्रभारी असून, संजय टंडन सहप्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. तरुण चुघ यांना जम्मू-काश्मीरचे प्रभारी तर आशिष सूद यांच्याकडे सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. खा. लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. डॉ. राधामोहनदास अग्रवाल यांच्याकडे कर्नाटकचे प्रभारी म्हणून तर सुधाकर रेड्डी यांच्याकडे सहप्रभारी म्हणून दायित्व देण्यात आले. राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे यांना मणिपूरचे तर, रघुनाथ कुळकर्णी यांना अंदमान निकोबारचे प्रभारी म्हणून उत्तरदायित्व देण्यात आले.